उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद शहरातील सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात अशी मागणी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. उस्मानाबाद तालुक्यात ही रुग्ण संख्या वाढत असल्याने कडक नियम लावून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी चर्चा करून लवकरच ठोस निर्णय घेण्यास भाग पाडू असे आमदार कैलास पाटील म्हणाले.  आमदार कैलास पाटील  व नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी कडक लॉकडाउनची मागणी केली आहे.

शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. शहरात कोरोना प्रतिबंध रोखण्यासाठी 15 मे ते 22 मे  या काळात सर्व आस्थापना 100 टक्के बंद ठेवून शहरात नागरिकांना फिरण्यास मज्जाव करावा त्यामुळे बाधीत व्यक्तींचे प्रमाण आटोक्यात येईल. 

उस्मानाबाद शहरात सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद करण्याचे आदेश आहेत मात्र अनेक दुकाने सकाळी 11 पर्यंत उघडपणे सुरू असतात तर नंतर छुप्या मार्गाने ग्राहक येईल तसे सुरू असतात त्यामुळे बाजारपेठेत नेहमी गर्दी पाहायला मिळत आहे.

कळंब शहरातील व डिकसळ ग्राम पंचायत परिसरातील कोरोना बधितांची संख्या वाढती संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 10 मे ते 12 मे या कालावधीत कळंब शहर व डिकसळ ग्रामपंचायत हद्दीत जनता कर्फ्यु आदेश लागू करण्यात येत आहे. या कालावधीत फक्त दवाखाने व मेडिकल स्टोअर्स, बँका (दुपारी 12 पर्यंत जनतेसाठी ,त्यानंतर अंतर्गत कामे करू शकतात), शासकीय कार्यालये वगळता सर्व आस्थापना बंद राहतील.शनिवार व रविवार जनता कर्फ्यु आदेश पूर्वीप्रमाणेच लागू राहतील असे आदेश कळंब उप विभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहेत यामुळे कळंब शहर व भागात 5 दिवस बंद राहणार आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले

कळंब शहरात रुग्ण वाढ झाल्याचे लक्षात येताच लॉकडाउन जाहीर केला आहे मात्र उस्मानाबाद तालुक्यात येथे रोज 300 च्या आसपास रुग्ण सापडत असून व सर्रास दुकाने सुरू असून देखील कडक लॉकडाउन लावला जात नाही.

 
Top