परंडा /प्रतिनिधी : - 

स्वराज्यातील छञपती शिवाजी महारांजाचे प्रामाणिक ,विश्वासु मावळे असणारे नरवीर शिवा काशीद यांची जंयती कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासन नियमांचे पालन करीत मराठा सेवा संघ व नाभिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने साध्या पध्दतीने बुधवार दि.५ रोजी  साजरी करण्यात आली.

येथील ग्लोबल इंग्रजी शाळेच्या प्रांगणात ,वीररत्न नरवीर शिवा काशीद यांच्या जंयतीनिमित्त तालुका मराठा सेवा संघ व नाभिक समाज बांधवाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी,डोंजा येथील भगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक जेष्ठ विचारवंत भारत घोगरे,तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरख मोरजकर,मुख्याध्यापक अनंत सुर्यवंशी,प्रकाश काशीद,मयुर डाके,शिक्षक शेळके, यांची  उपस्थिती होती.यावेळी जेष्ट विचारवंत भारत घोगरे यांनी ऐतिहासिक दाखले देत, शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी पन्हाळगडावर आपल्या प्राणाची बाजी लावुन बलिदान देणारे ,गुप्तहेर खात्याचे प्रमुख नरवीर शिवा काशीद  यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.वीर शिवा काशीद हे छञपती शिवरायांचे एकनिष्ठ मावळे होते.त्यांनी केलेल्या प्राणदान,हुतात्म इतिहासात कायम सर्वांच्या स्मरणात राहणारे आहे. वीर शिवा काशीद यांचे पन्हाळगड पायथ्याशी मोठे स्मारकही उभारण्यात आले आहे.

 

 
Top