तुळजापूर  / प्रतिनिधी-

काक्रंबा गावातील कोरोना उच्चाटनासाठी गावातील मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, पोलिस कॉन्स्टेबल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित बैठक घेण्यात आली. काक्रंबा गावात  महिनाभरात येथे 134 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 25 रुग्ण आय सोल्युशन मध्ये उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 3 रुग्णांचा कोरोनामळे मृत्यू झालेला आहे.  

या बैठकीत जनता कर्फ्यूचे कडक अंमलबजावणी करणे, किराणा दुकानदारांनी गर्दी टाळण्यासाठी होम डिलिव्हरी द्वारे घरपोच लागणारा किराणामाल देणे, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कर्मचारी व शिक्षक यांनी प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सर्दी, ताप, खोकला आदी आजाराचे सर्वेक्षण करून तात्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देणे. गावच्या सर्व सीमा सील करणे, पोलिस प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या लोकांवर गुन्हे दाखल करणे, तसेच अत्यावश्यक अस्थापना सोडून इतर दुकाने उघडी राहिल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. इत्यादी बाबींवर निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर उपाययोजना म्हणून गावांमध्ये सोडियम हायफोक्लोराइड ची जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. तसेच लाऊडस्पीकर द्वारे ही कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.असे सांगण्यात आले 

या बैठकीला ग्रामसेवक चैतन्य गोरे, उपसरपंच अरविंद कानडे,मुख्याध्यापक बाबुराव चव्हाण, ग्रा.प. सदस्य श्रीमंत देवगुंडे, बबलू घोगरे, उमेश पांडागळे, पोलीस कॉन्स्टेबल माळी, पोलीस पाटील प्रमोद खताळ, शहाजी ननवरे, अशोक कंदले, विनोद साबळे, शहाजी देवगुंडे, महेश सुरवसे, करीम अन्सारी, सचिन बंडगर,    समाधान पाटील, शिवाजी सुरवसे, चेतन बंडगर आशा कार्यकर्ती व अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते.

 
Top