तुळजापूर  / प्रतिनिधी- तालुक्यातील  मंगरुळ येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये   छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, रमजान ईद, अक्षय तृतीया निमित्त  ‘”माझा वार्ड माझी जबाबदारी’” या अनुषंगाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन  हायड्रोक्लोराइड फवारणी संपूर्ण वॉर्डांमध्ये करण्यात आली.

 त्याच बरोबर संपूर्ण वॉर्डांमध्ये मास्क चे महत्व सांगून मास्क वाटप केले. या वेळेस  अप्पा डोंगरे,  प्रमोद क्षिरसागर ,  सत्तार मुलांनी, अजिंक्य सरडे राहुल दुलंगे, सयाजी शिंदे धनंजय लबडे भैय्या माशाळकर, दिलदार शेख, सिकंदर,बाबा, प्रशांत खोपडे निहाल शेख मंगेश सुतार सुमित उपासे  इत्यादी उपस्थित होते

 
Top