परंडा / प्रतिनिधी :-

कोरोना चा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तांदुळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. 

      यावेळी गावापातळीवर  करण्यात येणाऱ्या उपाययोजना उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सुविधा याची माहिती घेतली.सर्वांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्यरीतीने पालन करावे अशा सूचना दिल्या.आमदार सावंत यांच्या माध्यमातून आज पर्यंत कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी भरगोस अशी मदत करण्यात आली आहे, कालच परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन स्वखर्चाने आमदार सावंत यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुगणांना दिलासा होणार आहे .येणाऱ्या काळात देखील आवश्यक ते आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सावंत प्रयत्नशील आहेत.तरी आपण शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सर्वांनी सहकार्य करावे. तसेच घरी रहा सर्वांनी सामाजिक आंतर, सॅनिटायझर, मास्क या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.असे आवाहान धनंजय सावंत यांनी केले आहे.

 
Top