उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोनाचा पूर्णतः संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून गावातील एक न एक आजारी व्यक्ती शोधून काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी गावोगावी काम करत असलेल्या आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, शिक्षक, सरपंच इत्यादीशी संवाद साधुन सूचना दिल्या आहेत. 

गावातील काही लोकांमध्ये आजही चुकीचा समज आहे की आपण आपला आजार असाच आंगावर काढला तरी तो आपोआप बरा होईल, किंवा आपोआप निघून जाईल. स्थानिक डॉक्टरांकडून गोळ्या औषध घेतल्यामुळे कोणाला आजाराबद्दल सांगण्याची गरज नाही असेही काही लोक समज करून जिल्हा परिषद अंतर्गत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना खरी माहिती देत नाहीत. त्यामुळे परिस्थिती आवाक्या बाहेर गेल्यानंतर दवाखाना गाठणयाशिवाय पर्याय राहत नाही असे रुग्ण निदर्शनास येत आहेत. याचा विपरीत परिणाम कोरोनाची रुग्ण संख्या वाढणयावर होत आहे.  हे रोखण्यासाठी तपासणी पथकाने गावातील इतर नागरिकांच्या मदतीने रुग्णांचा शोध घेण्याचे काम कसोशीने केले पाहिजे व नागरिकांनीही स्वतःहून आपले आजार सांगितले पाहिजेत. असे केले तर रुग्णावर वेळेवर उपचार होतील आणि कोरोणाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे फड यांनी कर्मचाऱ्यांची व नागरिकांशी संवाद साधताना प्रत्यक्ष भेटीत म्हटले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील काही गावांना फड यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांचे समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दीवाने, डॉ. किरण गरड, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

 
Top