उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवा निवृत्त रोखपाल विजयश्री जालिंदर कांबळे (  61  ) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तेर तेथील शाखेत रोखपाल म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य केले. 4 मे रोजी अल्पशा आजाराने त्यांचे   निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी ,  सुना आणि 7 नातवंडे असा मोठा परिवार आहे.उस्मानाबाद येथील प्रा. प्रशांत जालिंदर कांबळे यांच्या त्या मातोश्री तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे यांच्या सासू होत.


 
Top