सरपंच व सरपंच पतीला लाच घेताना पकडले

बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा झाला दाखल

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 रोजगार मस्टरवर सही करण्यासाठी युवा शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथील सरपंच कांबळे व त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मेंढा (ता. उस्मानाबाद) येथील  युवक शेतकऱ्याने शिवारातील त्याच्या शेतातील शासकीय फळबाग जोपासना योजनेतून शेवगा लावला आहे. एमआरईजीएसमधून याला अनुदान देण्यात येत असते. यासाठी एमआरईजीएस मधूनच मजूरांना रोजगार देण्यात येत असतो. मात्र, याचे मस्टर संबंधित विभागाला सादर करावे लागते. यामुळे शेवग्याच्या मशागतीकरीता रोजगार मागणी पाच मस्टर व अर्जावर  सही करण्यासाठी सरपंच पती विश्वनाथ गोंविंद कांबळे व सरपंच शशिकला विश्वनाथ कांबळे यांनी पाच हजार रुपये साक्षिदारामार्फत मागितले.  याप्रकरणी युवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तेव्हा लाचलुचपत विभागाने सापळा लावला. व  दोघांना पकडण्यात आले.  याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top