उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात जनता कर्फ्यू अंमलात असून मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस दलातर्फे विविध कायदा, कलमांतर्गत संबंधित पोलिस ठाण्यात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जब्बारभाई बेग (भूम) यांनी भूम येथील मसाल्याचे दुकान चालू ठेवले तर धर्मराज सातपुते (रा. वाकवड) यांनी किराणा दुकान व्यवसायास चालू ठेवले हाेते. कल्याण गलांडे (रा. सुकटा) यांनी गावातील आपले तुळजाई पान स्टॉल व्यवसायास चालू ठेवले तर याकूब शेख (रा. बावी, ता. भूम) यांनी बावी येथील चिकन सेंटर चालू ठेवल्याचे भूम पोलिसांना आढळले. चोराखळी (ता. कळंब) येथील श्रीराम साठे, दत्ता वाघमारे हे मास्क न लावता कळंब शहरात अकारण फिरत असल्याचे कळंब पोलिसांना आढळले. महेश दुगाने (रा. शिराढोण) व सचिन कुलकर्णी (रा. तांदुळजा) हे दोघे मास्क न लावता शिराढोण येथे सार्वजनिक ठिकाणी फिरताना पोलिसांना आढळले. औदुंबर पिंगळे (रा. तुळजापूर) यांनी आपले तुळजाई भेळ सेंटर हे दुकान चालू ठेवून व्यवसाय करताना तर विजय शिंदे (रा. तुळजापूर) हे आपले सिद्धी ऑटोमोबाइल्स हे दुकान चालू ठेवून व्यवसाय करताना तुळजापूर पोलिसांना आढळले. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाेलिसांनी कारवाया केल्या.

 
Top