उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

वाशी तालुक्यातील विजोरा येथे कोयता, कुऱ्हाडीचा धाक दाखवून घरासमोर झोपलेल्या दोघांना लुटणाऱ्या चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने ३६ तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

विजोरा येथील निखील भैरट, भिवा कदम हे दोघे शुक्रवारी मध्यरात्री अंगणात झोपले होते. दरम्यान पाच दरोडेखोर तेथे आले. त्यांनी कोयता, कुऱ्हाड, काठीचा धाक दाखवून त्यांच्या जवळील दोन मोबाइल व २५ हजार रुपये लुटले. तसेच गावकरी आप्पा कदम यांच्या घरात घुसून त्यांचाही मोबाइल चोरला होता. यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलिस नाईक हुसने सय्यद, अमोल चव्हाण, हवालदार बबन जाधवर, आरसेवाड, माने यांच्या पथकास दरोडेखोरांची नावे प्राप्त झाली. तेव्हा अनुज गणेश भोसले (२१, रा. डोकेवाडी, ता. भूम), सुबराव रंगा शिंदे (३०, रा. पिंपळगाव, क. ता. वाशी), वैभव एकनाथ शिंदे उर्फ गोलड्या (१८, रा. फकराबाद, ता. जामखेड), ज्ञानेश्वर लिंगा काळे (२१, रा. पांढरेवाडी, ता. परंडा) या चौघांनी दरोडा टाकल्याचे समजले. चौघांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेवून दरोड्यात लुटलेला माल, दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच त्यांनी वाशी घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेले २४ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहे.

 
Top