वाशी  / प्रतिनिधी- 

लॉक डाऊन मध्ये कोरोना साथीने उपासमारीला सामोरे जात असलेल्या गरजू –गरीब कुटुंबाना मदतीचा हात पुढे करत मदत नव्हे कर्तव्य म्हणून प्रशांत बाबा चेडे यांनी मुस्लीम समाजातील  ३५१ मुस्लीम कुटुंबियांना ईद निमित्त कीट चे वाटप केले 

   कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत.लॉकडाऊन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे .त्यातच मुस्लीम समाजाची रमजान ईद असल्यामुळे सदर कीट वाटप करण्यात आले .सदर कीट मध्ये खोबरे, खजूर ,काजू ,बदाम,चारुळे,मगज,खसखस,इलायची,किसमीस,जिरे,बडीशोप ,खातासोडा ,डालडा,शेवई,साखर ,तेलपुडा  इत्यादी साहित्यांचा समावेश आहे .

यावेळी नगरअध्यक्ष नागनाथ नाईकवाडी ,उप नगरअध्यक्ष प्रसाद जोशी ,माजी नगर अध्यक्ष नितीन चेडे,विकास मोळवणे, सतीश शेरकर ,मकरंद शिंगणापुरे ,अजय वीर,रमेश नन्नवरे ,बाळासाहेब सुकाळे ,सैफुद्दीन काझी,अखिल कुरेशी इत्यादी हजर होते.


 
Top