उमरगा / प्रतिनिधी- 

तालुक्यातील कोरेगाववाडी येथे सोमवारी दि.17 रोजी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील पाऊनेतीन लाखाचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केली याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात उमरगा पोलिसात मंगळवारी दि.18 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील कोरेगाववाडी येथील बळीराम लक्ष्मण लवटे वय 55 वर्षे व्यवसाय शेती रा.कोरेगाववाडी ता.उमरगा हे सोमवारी दि.17 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराला कुलुप लावुन घरापासुन थोड्या अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या घराच्या बांधकामाजवळ जावुन झोपले होते.दुसऱ्या दिवशी मंगळवार दि.18 रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास ते घराकडे आलो असता घराला लावलेले कुलुप तसेच असुन त्याचा कोंडा उपसुन निघालेला दिसला व घराचे दार उघडे दिसले. आतमध्ये जावुन पाहीले असता घरातील

लोखंडी कपाट उघडे दिसले व कपाटातील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.तर कपाटातील लॉकर कुलुप कटरने कापून लॉकरमध्ये ठेवलेला 112 ग्रम वजनाचे 40 हजार किमतीचे सोन्याचे एक लॉकेट,12 ग्रॅम वजनाचे 80 हजार किमतीचे सोन्याचे 2 नेकलेस ,7 ग्रॅम वजनाचे 50 हजार किमतीचे सोन्याचे 02 जोड झुमके,10 ग्रम वजनाचे 30 हजार किमतीचे सोन्याचे बोरमाळ,10 ग्रम वजनाचे 40 हजार किमतीचे सोन्याचे सरपाळे व जिरामणी व रोख रक्कम 7,000 रुपये असे एकूण 2 लाख 47 हजार रुपयाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम लॉकर मध्ये दिसुन आले नाही.त्यानंतर त्यांनी पोलिसात खबर दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव,स.पो.नी महेश क्षीरसागर,पो.उ.नी.अमोल मालुसरे हे पोलीस पथकासह दाखल झाले यावेळी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.मंगळवार दि.18 रोजी बळीराम लक्ष्मण लवटे वय 55 वर्षे व्यवसाय शेती रा.कोरेगाववाडी यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास स.पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर हे करीत आहेत.

 
Top