तुळजापूर / प्रतिनिधी- 

स्वर्गीय दयावान अप्पा कै सुरेशप्पा पाटील व आई बाबांच्या संस्कारातुन सीमांश डायग्नोस्टीक्स सेंटर सुरु करीत असुन माझे चुलते कै सुरैशप्पा दयावान पाटील यांच्या प्रमाणे मी प्रामाणिकपणे जनसेवा करणार असल्याचे प्रतिसाद सीमांश डायग्नोस्टीक्स सेंटर चे प्रमुख डाँ अक्षय शशीकांत पाटील यांनी केले.

तुळजापूर तालुकावासियांना सोनोग्राफीसह अन्य महत्वपुर्ण असणाऱ्या सुविधा मिळविण्यासाठी उस्मानाबाद -सोलापूरला जावे लागत होते ही गरज ओळखुन तुळजापूरचे भूमीपुञ असलेल्या डाँ.अक्षय पाटील यांनी तिर्थक्षेञ तुळजापूरात डायग्नोस्टीक्स सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेवुन ते सुरु केले.

येथे अवघ्या अर्धा तासात सिटीस्कँन केल्यानंतर आम्ही रिपोर्ट देणार असुन यासाठी लागणारी फि  येथे चालु असणारी आहे ही सेवा आम्ही अखंडीत देणार आहोत. या सेवेमुळे विविध विकार आजाराचे तातडीने उपचार करणे शक्य होवुन यात रुग्णांचा पैसे व वेळेची बचत होणार आहे,

नळदुर्ग रोडवर हे डायक्नोस्टीक्स सेंटर  डाँ अक्षय पाटील व त्यांच्या पत्नी डाॅ. नेहा अक्षय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित राहणार आहे.  यावेळी डॉ. अक्षय पाटील त्यांचे वडील शशीकांत पाटील, कैलास पाटील, आनंद कंदले, महेश गवळी, जीवन इंगळे उपस्थितीत होते.


 
Top