उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पुणे येथील दोन तरुण उस्मानाबाद येथे नकली सोने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. 

मिळालेल्या माहिती नुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे   पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि  श्री मनोज निलंगेकर, पोना- दिपक लाव्हरे पाटील, संतोष गव्हाणे, पोकॉ- अशोक ढगारे यांच्या पथकाने दि. 05 मे.2021 रोजी   उस्मानाबाद शहरालगतच्या महामार्गावरील साई हॉटेल समोर सापळा लावलण्यात आलेला होता. 

 यावेळी लॉकडाऊन काळात सुझूकी स्विफ्ट कार (क्र. एम.एच. 12 एसएल 6376) मधून पुणे जिल्ह्यातून विनापरवाना उस्मानाबाद येथे आलेले तरूण दिलीप प्रतापसिंग सुरडकर, जब्बार करीम शेख, (रा. पुणे) हे दोघे एका ग्राहकास खरे सोने भासवून नकली सोन्याच्या 8 अंगठ्या विक्री करत असतांना आढळले. यावरुन पोलीसांनी त्या दोघांना नकली सोने, दोन स्मार्टफोन व कारसह ताब्यात घेउन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम माहितीनुसार आनंदनगर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 420, 511, 269, 271, 188, 34 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे


 
Top