तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील सागर कदम व सुहास कदम या युवकांनी १२४ भक्त निवास येथील कोविड केअर सेंटरमधील कोरोनाग्रस्तांना फळे वाटप केली.

कोरोनाग्रस्त रुग्णांना आवश्यक जीवनसत्वे मिळून रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार म्हणून फळे वाटप करण्यात आली. यावेळी २५ किलो चिक्कू तसेच दोन कॅरेट केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, राम चोपदार, दिपक कदम, अादित्य कदम आदींची उपस्थिती होती. तसेच सर्वांना याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करावे याबाबत हे मार्गदर्शन होते.

 
Top