तुळजापूर / प्रतिनिधी-  

कोरोना महामारी पार्श्वभूमीवर लाँकडाऊन नंतर प्रशासनाने जनता  कर्फ्यु  जाहीर करण्यात आला असुन याची कडक अंमलबजावणी होत असल्याने श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात एकही भाविक फिरकत नसल्याने मंदीर परिसरात असणारे वृध्द, अंध, अपंग, मतिमंद भिका-यांना उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. 

तिर्थक्षेञ तुळजापूरात  कुणीही उपाशी मरत नाही अशी तुळजापूरची ख्याती आहे. व ते  कोरोना आगमना पुर्वी सत्य होते पुर्वी तिर्थक्षेञ तुळजापूरात वृद्ध ,अपंग,अंध, मतिमंद भिकारी मोठ्या संखेने होत.े भाविक देवीदर्शन करुन आले की  भिका-यांचा परडीत पीठमीठ घालुन व पैसे टाकुन  देविचा परड्या भरण्याचा विधी सर्वच भाविक करीत असल्याने येथील भिका-यांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला होता. माञ कोरोना आगमन होताच भाविकांना श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ प्रशासनाने प्रवेश बंद केल्याने भिका-यांचा पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण होवु लागला यात ज्यांचे नातेवाईक होते ते भिकारी तुळजापूरातुन गेले पण ज्यांचे या जगात  कुणीही नाही अशी वयोवृध्द, अंपग, मतिमंद, भिकारी येथेच राहिले अंशत लाँकडाऊन मुळे कसे तरी पोट भरत होते माञ कडक जनता कर्फ्यु लागु करतच भाविक मंदीराकडे येणे बंद झाल्याने येथे बसणा-या अंध, मतिमंद, अपंग, भिका-यांचा पोटचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. सध्या मंदीरासमोर हे मंडळी परडी घेवुन रस्त्यावर बसत आहेत पण येथे भाविकच येत नसल्याने यांना भिक मिळत नसल्याने यांना उपासमारीस सध्या समोरे जावे लागत आहे,

 
Top