तुळजापूर / प्रतिनिधी -
नगर परिषदेची कोरोना निर्मूलनाच्या अनुषंगाने 4 थ्या दिवशीही धडक कारवाई केली असून सोमवार दि3 रोजी सायंकाळी उशिरा तपासणी केली असता तीन दुकाने उघडी असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली .मंगळवार दि.4 रोजी पाच दुकाने सकाळी 11-00 नंतरही चालू असल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असून 2 विना मास्क फिरणारे व्यक्तींना दंड करुन एकूण ₹ 4600 दंडाची वसुली करण्यात आली.
सदर मोहीम मुख्याधिकारी श्री. आशिष लोकरे यांच्या नेतृत्वात राबवण्यात येथ असून मुख्याधिकारी शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरत असून, जास्तीत जास्त लोकांना कोरोना विषयक माहिती देत असुन लोकांना हात धुणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सीग या विषयी स्वतः अवगत करत असून त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली असून कोरोनावर नियंत्रण मिळण्यास नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी व सर्व सन्मा.सदस्य तुळजापूर नगरपालिका प्रयत्नशील आहेत.