उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त चिखली (ता.उस्मानाबाद )येथे शुक्रवारी (ता.14) कोरोना तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले.यावेळी जवळपास 43 लोकांनी अँटिजेन टेस्ट करुन घेतली त्यामध्ये एक जणाची टेस्ट पॉझीटव्ह आली असुन त्यांना वैद्यकीय उपचार सूरु केले आहेत. 

कोरोनाच्या रुग्णाची झपाट्याने वाढ होत असुन त्याला रोखण्यासाठी चिखली ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना दक्षता समिती स्थापन करुन अत्यंत चांगले नियोजन करत ही साथ रोखण्यात यश मिळविले आहे.साधारण सहा ते सात हजार लोकवस्तीच्या मोठ्या गावामध्ये कोरोना रुग्नाचे प्रमाण अत्यंत नगण्य ठेवण्यात समितीला यश आले आहे.शाळेतील शिक्षक,अंगणवाडी सेविका,आरोग्यसेविका,आशा कार्यकर्त्या गावाचा सर्व्हे करून नागरिकाचे तापमान त्यांची ऑक्सिजन पातळी तपासुन प्रत्येक कुटुंबातील सदस्याची भेट घेऊन सर्वे मोहीम यशस्वी केली.माजी सरपंच देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच वृंदावणी जाधवर यांच्या पुढाकाराने संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने गावात कोरोना तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले.

उपसरपंच उत्रेश्वर जाधव,विकास जाधव, संजय गोडसे, बापू जावळे,श्याम जाधवर,काकासाहेब खंडाळकर,समाधान जाधव,सचिन जाधव,पवन जाधव यानी हे शिबीर यशस्वी केले. याअगोदर गावामध्ये तीनवेळा लसीकरणाचेही शिबीर आयोजीत केले असुन लसीचा साठा उपलब्ध झाल्यास दर आठवड्याला गावामध्ये एक दिवस शिबीर आयोजीत करण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सूरु आहे. हे शिबीर आयोजीत करण्यासाठी पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय माने, समुदाय आरोग्य अधिकारी रिमा इंगळे, परिचारीका व्ही. आर. घुगे, एस.डब्ल्यु.माने यानी सहकार्य केले आहे.

 
Top