लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यु असताना दुकाने उघडे ठेवणाऱ्या 15 दुकाने पुढील आदेशापर्यत तहसिलदार संतोष रूईकर यांनी सिल केले. लोहारा तालुक्यातील आता पर्यतची ही सर्वात मोठी कारवाई असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. 

लोहारा शहरासह तालुक्यात गेले दोन महीण्यापासुन दिवसेनं दिवस कोरोनाचे रुग्ण दिवसाकाठी 30 ते 40 वाढत असून तालुक्यात कोरोना रुग्णांचा 1700 रुग्णांचा आकडा पार केले असून आतापर्यत 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात लोहारा तालुक्यातील 17 गावामधील नागरीकांचे कोरोना रीपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरीकांच्या हालचाली, संपर्क निर्बध घालून मज्जाव करण्यात आला असून या गावच्या 3 कि.मी.चा परीसर रेड झोन तर 7 कि.मी.पर्यतचा परीसर हा बफर झोन म्हणून घोषीत करुन गावाच्या सिमा बंद करण्याचे आदेश उपविभागिय अधिकारी विठ्ठल उमदले यांनी दि.23 एप्रिल रोजी आदेश काढले. यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व उपविभागीय अधिकारी विठ्ठल उमदले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 मे रोजी महाराष्ट्र दिनी स्वत: तहसिलदार संतोष रुईकर, नायब तहसिलदार रणजित शिराळकर, लोहारा मंडळ अधिकारी बी.एस.भरनाळे, जेवळी मंडळ अधिकारी एम.एस.स्वामी, तलाठी अरुण कांबळे, एस.जी.माळी, हगंरगे, भागवत गायकवाड, बालाजी चामे, यांच्यासह, कोतवाल, गाव स्तरावरील पोलीस पाटील आदींनी शहरासह ग्रामीण भागात जनता कर्फ्युची प्रभावी पणे अंमलबजावणी करीत आहेत. पहाणी करीत असताना कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचे दिसुन आले. तसेच कांही किराणा दुकान मालक, हॉटेल चालक बंद काळात लपवून व्यवसाय करताना लोहारा शहरातील 6, उत्तर जेवळी 2, तावशीगड 2, तर नागराळ, आष्टामोड, उदतपुर, लोहारा खुर्द, माळेगाव येथील प्रत्येकी एक, एक असे 15 दुकाने आढळुन आल्याने त्यांची दुकाने पुढील आदेशापर्यत तहसिलदार संतोष रुईकर यांनी सिल केली आहेत. या कारवाईमुळे जनता कर्फ्यु असताना दुकाने उघडे ठेवणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

 
Top