तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर -उस्मानाबाद रस्त्यावर असणाऱ्या कावलदरा (ता.जि. उस्यामानाबाद ) येथील उड्डाणपुलाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह  मंगळवार दि.१३ रोजी दुपारी ३  वाजता आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 धुळे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या कावलदरा (ता.जि. उस्यामानाबाद ) गावानजीक उड्डाण पुलाखाली एक अनोळखी इसमाचा मृतदेह,असल्याची माहीती तुळजापूर पोलिसांना मिळताच तुळजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

परंतु त्या इसमाच्या मृत्यू नेमका  कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.  मात्र, हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी उस्मानाबाद आणि तुळजापूर पोलीस दाखल झाले होते.  सदरील मृतदेह फुगलेल्या अवस्थेत दिसु  आल्याने   तो दोन,ते तीन दिवसा पुर्वीचा असल्याची शक्यता  वर्तवली जात आहे. मृतदेह परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली होती सदरील घटना खुन कि आत्महत्या हे शवविछेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.सदरील घटनेचा तपास उस्मानाबाद ग्रामीण पोलिस करीत आहेत.

 
Top