तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सोमवार दि. 12 रोजी शहरात दोन ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १३९ रक्तदात्यांनी रक्त करुन सामाजिक बांधलिकी जोपासली.
जिजामाता नगर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .यावेळी युवा नेते श्री विनोद गंगणे , राहुल परमेश्वर कदम, श्री दिनेश पलंगे,समाज सेवक श्री संतोष आप्पा इंगळे , प्रताप चौरे आदी उपस्थीतीत होते. येथे ७२ जणांनी रक्तदान केले . शिबीर यशस्वीतेसाठी सतीश माने, दत्ता जगताप, रोहित दाभाडे, ओमकार काटवटे, मंथन रांजणकर , मनोज काचोळे, दीपक पलंगे अदिनि परिश्रम घेतले
कै. कावरे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर
कै. दिगंबरराव कावरे गुरुजी यांच्या १७ व्या. पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी , माजी नगरसेवक विनोद ख् पलंगे, भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वाती नळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ प्रा. प्रशांत भागवत ,राहुल भोसले रामचंद्र गिड्डे , अॅड. दिपक हुंडेकर, श्रीमती निर्मला कावरे, राजाभाऊ कावरे ,स्वाती कावरे आदी उपस्थितीत होते.
या शिबिरात कुमारी सुप्रिया बडोदकर, रुचिता क्षीरसागर, नेहा बडोदकर या युवतीने महिला प्रतिनिधी म्हणून रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महेंद्र कावरे, बालाजी कामे, चंद्रकांत जटाळ, रामेश्वर आपुणे ,दामू घागरे औदुंबर कावरे ओम कावरे, काका कावरे, यशवंत कावरे, रंगनाथ कावरे, आकाश चौधरी, राहुल कावरे, देवेंद्र कावरे यांनी परिश्रम घेतले