तुळजापूर / प्रतिनिधी-

कुलस्वामीनी तुळजाभवानी मंदिरात गुढी पाडव्याचा सण  बुधवारी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मंदिरावर  तुकोजी बुवा यांच्या शुभहस्ते गुढी उभारण्यात आली. कोरोनाचे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात सर्व सण पारंपारिक पद्धतीने साजरे करण्यात येतात. कोरोनाचे संकट असल्यामुळे यावर्षीही गुढी पाडव्याचा सण साध्या पद्धतीने भाविकांविना साजरा करण्यात आला. प्रथेनुसार महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. या वेळी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदिर संस्थानचे कर्मचारी गणेश नाईकवाडी, संकेत वाघे, रवी गायकवाड, लखन छत्रे यांच्यासह मोजके पुजारी उपस्थित होते.

 
Top