तेर  / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बौद्ध स्तूपाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बौद्ध स्तूप परिसरात लोकसहभागातून होत असलेल्या विकास कामाची आ.पाटील यानी पाहणी आहे. यावेळी त्यांनी विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही  दिली. यावेळी बौद्ध स्तूप परिसरात आ. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, सरपंच नवनाथ नाईकवाडी, सुभाष कुलकर्णी, सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे ,प्रभाकर शिंपले,सुरेश माने,  बापू नाईकवाडी ,रविराज चौगुले उपस्थित होते.


 
Top