कळंब - ( शिवप्रसाद बियाणी

माहेर कडील कुटुंब निरक्षर होते.वडिलांनी मुलीला शिकविण्याचे धाडस केले व पुढे पती ह.भ.प महादेव महाराज आडसुळ यांनी शिक्षिका म्हणून नोकरी करण्यास परवानगी दिली त्यामुळे नौकरी व सामाजिक कार्य शक्य झाले असे भावपुर्ण उद् गार सरस्वती घुले यांनी सत्कारस उत्तर देतानी काढले.

श्री संत ज्ञानेश्वर बालकाश्रमाच्या प्रांगणात मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१ एप्रिल रोजी जनजागृती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सेवानिवृत्तिनिमित्त श्रीमती सरस्वती घुले यांचा सपत्तीक गौरव करण्यात आला. यावेळी सुरेश टेकाळे, डि.के.कुलकर्णी,माधवसिंग राजपूत,सचिन क्षिरसागर,सहशिक्षिका शैला पाखरे,सहशिक्षक पी.जी.सुरवसे,बी.बी.चौधरी,के.यु.मुंडे आदींनी सरस्वती घुले यांच्या सेवेदरम्यानच्या काळात सामाजिक कार्याचा मागोवा घेतला. कोमल पाखरे ह्या विद्यार्थ्यांनीने सरस्वती घुले यांच्या कार्यावर कविता सादर केली .जनजागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक चंदनशीव आर बी, दीनदयाळ बँकेचे संचालक कुलकर्णी,यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक गोडसे,बाबूराव पाखरे,सुभाष घोडके,

अंजली साखरे,प्रकाश टेकाळे,संध्या गायकवाड,सहशिक्षक शेख,जगन्नाथ रोटे,विठ्ठल नरटे,विशाल पाखरे, सौ.उर्मिला देशमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापिका,अजित देशमुख,सौ. महादेवी देशमुख, सौ.सुनिता आडसूळ,महाविष्णू आडसूळ यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी बि.जी यांनी केले तर आभार ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांनी मानले

 
Top