तुळजापूर / प्रतिनिधी-

अनादी काळापासून गावकुसाबाहेर राहाणारा उपेक्षीत,वंचित,मागासवर्गीय समाजास त्यांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना कार्यन्वीत केली.ह्याचा लाभ देण्यासाठी पुर्वी इंदिरा गांधी आवास योजनेत दारिद्र्य रेषेची अट होती.सदरील अट रमाई  योजनेत शिथील झालेली आहे. त्यामुळे सर्व मागासवर्गीय बेघर कुटूंबास लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सामाजिक कर्तव्य व गावच्या सरपंच ह्या नात्याने काटगावच्या सरपंच सौ.नगीनाताई सोमनाथ कांबळे यांच्या सकारात्मक प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात पात्र असलेले ७० अर्जास मंजूरी मिळाली आहे. उपसरपंच अशोक माळी,

ग्रामसेवक भीमराव झाडे,रोजगार सेवक इरफान शेख,ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत मुळे यानीं परीश्रम घेतले आहे.  मंजूर घरकुला पैकी ४० लाभार्थींना पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला असून उर्वरीत लाभार्थीनां एक दोन दिवसात पहिला हप्ता मिळणार आहे. अनेक घरकुलाचे बांधकाम पुर्णत्वाडे तर काही प्रगतीपथावर आहेत.सदरील मंजूर असलेले लाभधारक हे सन.२०१७ - १८ मधील प्रतिक्षा यादीमधील असल्याचे सरपंच सौ.नगीनाताई कांबळे यानीं ही माहिती दिली.

 
Top