तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील उपजिल्हारुग्णालयात कार्यान्वित असलेल्या दोन लसीकरण केंद्रात ७३०६ नागरिकांना लस देण्यात आली आहे 

माञ मागील दोन दिवसापासुन लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण खोळबले आहे.आजपर्यंत कोवाँक्सीन च्या २८०६व कोविडशिल्डचा ४५००अशा ऐकुण ७३०६ नागरिकांना पहिल्या व दुसरी लस देण्यात आली आहे लवकरच १मे नंतर १८वर्षाचा पुढील नागरिकांना लस दिली जाणार असल्याने लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने शहरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी पुढे येत आहे.

लसीकरण आरंभ होताच प्रथमता लस घेण्यासाठी नागरिक तितकसे उत्सुक नव्हते माञ दुसऱ्या टप्यातील  कोरोनाचावाढत्याप्रादुर्भाव सुरु होताच नागरिकांंची लस घेण्यासाठी झुंबड उडाली लस घेण्यासाठी नागरिक अधिक संखेने येवु लागल्यामुळे  लसीचा तुटवडा होण्यास आरंभ झाला . बुधवार व गुरुवार  वरुन लस उपजिल्हारुग्णालयाला उपलब्ध न झाल्याने लस घेण्यासाठी सकाळी उपजिल्हारुग्णालयात आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे

लस केव्हा येणार याची माहीती नागरिकांना मिळत नसल्याने सकाळी नागरिक लसीकरण केंद्रावर येत असुन लस उपलब्ध नाही म्हणताच परत जात आहेत .

जसजस कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे तसतसे लस घेण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढत आहे.लस उपलब्धतेची माहीती एकदिवस अगोदर दिली तर लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय दूर होईल,अशी मागणी नागरिकांना मधुन केली जात आहे.


 
Top