तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर  शहरातील एका ३० वर्षीय युवकाने  तडवळा  (ता. तुळजापूर) येथील शेतीत लिंबाच्या झाडास  दोरीने  गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.२९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की,तुळजापूर येथील  सतीश वसंत कांबळे  (३०) याने स्वतः च्या शेतीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून मयत सतीश कांबळे याला दोन वर्षीय मुलगी असून त्याच्या पाश्चात पत्नी ,एक मुलगी,आई,दोन सख्खे भाऊ,चुलते,चुलती,दोन चुलत भाऊ,भावजया,पुतण्या,पुतणी असा मोठा परिवार आहे.


 
Top