उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या रुपामाता अर्बन-मल्टीस्टेट समूहाला ६६ लाखांचा नफा झाला आहे. कोरोना महामारी, अवर्षण आणि ओला दुष्काळ, मंदीची लाट, गुंतवणुकीच्या व्याजदरात होत असलेली घट, या पार्श्वभूमीवर बँकेने भरीव कामगिरी केली आहे. यावर्षी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे नियोजन करण्यात आले, अशी माहिती रुपामाता समूहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांनी दिली आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात ३७२ कोटींचा व्यवसाय असून निव्वळ नफा ६६ लाख मिळवला आहे. यामध्ये एकूण ठेवी २०६ कोटी ६३ लाख झाल्या आहेत.

कर्जाचे वाटप १६५ कोटी ६७ लाख झाले आहे. अठरा हजार १८२ सभासद असून वसूल भागभांडवलात ६ टक्के वाढ होऊन भाग भांडवल २ कोटी ९२ लाख झाले आहे. ९५०० टन क्षमतेचे रुपामाता वेअर हाऊससह मालकीच्या, स्वमालकीच्या कोट्यवधींच्या वास्तू आहेत. समूहाच्या सर्व शाखेत लाॅकर सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारून कोअरबँकिंग कार्यप्रणाली अंमलात आणली आहे. एसएमएस सेवा, आरटीजीएस, एनइएफटी आदी अद्यावत सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय मुदतपूर्व कर्ज फेडणाऱ्या कर्जदारास व्याजात एक टक्के सूट आहे.

संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व संचालक सभासद, मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी, व्यवस्थापक सत्यनारायण बोधले, उपव्यवस्थापक मिलिंद खांडेकर आदींचे योगदान असल्याचे अध्यक्ष ॲड.व्यंकटराव गुंड यांनी सांगितले आहे.

या मल्टिस्टेटने कोरोना काळात हा फायदा मिळविला हे यात विशेष आहे. कारण कोरोना काळात अनेक लहान मोठया संस्थांनाही नुकसान सोसावे लागले होते.

 
Top