उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आणि वडगाव येथील  आरोग्य  उपकेंद्रास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी आज भेट देऊन पाहणी केली .

यावेळी त्यांनी कोरोना  लसीकरणाची माहिती घेऊन याबाबत काही महत्वपूर्ण सूचना केल्या . उपस्थित  पात्र लाभार्थ्याना लस घेण्याबाबत मार्गदशन केले .  तसेच गाव पातळीवरील सर्व पदाधिकारी सरपंच , ग्रामसेवक, तलाठी आणि  इतर नागरिकांनी  लस मोहिमेचे उद्दिष्ट  शंभरटक्के  साध्य करण्यास  सहकार्य करण्याचे आवाहन  केले . तसेच त्यांनी आरोग्य यंत्रणेस काही सूचनाही दिल्या  . माझे कार्यालय सुंदर कार्यालय मोहिम यशस्वीपणे राबवून अंतर व बाह्य परिसर स्वच्छता , झाडे लावणे झाडे जगवणे,  पक्ष्यांना चारा पाणी व्यवस्था  करण्याचे आदेश दिले .

 
Top