उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हयामधील बसव कल्याण येथे पोटनिवडणूक होत आहे . त्यासाठी  दि. 17 एप्रिल 2021 रोजी मतदान तर  दि. 2 मे 2021 रोजी मत मोजणी होणार आहे. त्या अनुषगाने बसवकल्याण सिमेलगत उमरगा तालुक्यातील अनुज्ञप्ती 5 कि. मी. अंतरातील बंद करण्याबाबत कळविण्यात आले  आहे. मतदान संपण्याच्या वेळेपुर्वीच्या 48 तासामध्ये मद्य  विक्री करण्यास मनाई  असून कोरडा दिवस जाहीर केला आहे .  याबाबात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी   लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) तसेच मुंबई मद्य निषेध कायद 1949 चे कलम 142 (1) नुसार तसेच नमूद मदय कायदया अंतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा तालुक्यातील बसवकल्याण व सीमेलगत 5 कि. मी. च्या आतील अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे व त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

दि.15 एप्रिल 2021 मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सांयकाळी 7.00 वा पासून दि. 16 एप्रिल 2021  मतदानाच्या पूर्वीचा अगोदरचा दिवस दि.17 एप्रिल 2021 मतदानाचा दिवस सांयकाळी 7.00 वाजे पर्यंत. जे अनुज्ञप्तीधारक या  आदेशाची अंमबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्या विरुध मुंबई दारु बंदी कायदा 1949 चे कलम 54 (सी) नुसार आवश्यक कार्यावाही करण्यात येईल असे या आदेशात म्हटले आहे.

 
Top