उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  पौरोहित्य करणाऱ्या पुरोहीतांना व पुजाऱ्यांना आर्थिक मदत द्या, या मागणीचे निवेदन परंडा नगर परिषदचे नगरसेवक मकरंद रामचंद्र जोशी यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे. 

  निवेदनात म्हटले आहे की, सध्या आपण सर्व कोव्हिड-१९ या महामारीच्या विळख्यात आहोत. आपण मुख्यमंत्री या नात्याने परिस्थितीवर सक्षमपणे लक्ष ठेऊन आहात. कोव्हिड-१९ महामारी रोखण्यासाठीच्या उपाय योजना चांगल्या प्रकारे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १५ एप्रिल २०२१ पासून आपण राज्यात लॉकडाऊन,संचारबंदीची घोषणा केली आहे. या काळात राज्यातील जनता उपाशी राहू नये. यासाठी आर्थिक व अन्नधान्य मदतीची घोषणा आपण केली आहे.

राज्यातील मंदीरे व धार्मिक विधी पूर्णपणे बंद असल्याने पौरोहित्य करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे.  तरी राज्यातील पुजाऱ्यांना व पौरोहित्य करणाऱ्यासाठी अन्नधान्य व आर्थिक पॅकेजची घोषणा करावी या मागणीचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे. 


 
Top