तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर-लातूर बायपास रस्त्यावर अपघातांचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या चौकाची पाहणी आराणाजगजितसिंहपाटील यांनी शनिवार दि३रोजी  करून  तात्काळ गतिरोधक तसेच इतरही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.त्या अनुषंगाने त्याच दिवशी बायपास वर असणाऱ्या दोन रस्त्यावर गतिरोधक तयार केले. 

बायपास रस्ता काम अपुर्ण असल्याने हा चौक  अपघात केंद्र बनले होते. या चौक रस्ता  पाहणी आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी पोलिस निरीक्षक श्री.मनोजकुमार राठोड, प्रोजेक्ट मॅनेजर श्री.सत्यरंजन राऊत, अॅथॉरिटी इंजीनियर श्री.व्ही.व्ही.कुलकर्णी, जूनियर इंजीनियर श्री.आनंद पुएद, महामार्ग पोलिस निरीक्षक श्री.पात्रे, श्री.आनंद कंदले अनिल बंडगर  आदीचा उपस्थितीत पाहणी करुण तात्काळ .उपाययोजना करण्याचे आदेश देताच तात्काळ मुख्य रस्ता वगळता बायपास वरील दोन रस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आले. उर्वरीत कामे लवकरच सुरु करणार असल्याचे ठेकेदारांने सांगितले. 

 
Top