उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महात्मा गांधी नगरमधील रहिवासी वैभवी जालिंदर राऊत हिची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड झाली.

वैभवी राऊत यांचे प्राथमिक शिक्षण नूतन प्राथमिक विद्यामंदिर तर माध्यमिक शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल , उस्मानाबाद येथे झाले. वडील रा. प. महामंडळ कर्मचारी असून आई जि.प. शिक्षिका आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.


 
Top