तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील संग्राम प्रशांत अपराध याने ६७ टक्के गुण मिळवत एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. २६) जाहीर करण्यात आला. यामध्ये संग्राम अपराध याने ६७ टक्के गुण मिळवत एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. संग्राम अपराधचे प्राथमिक शिक्षण शहरातील शांती सागर प्राथमिक विद्यालयात, माध्यमिक शिक्षण लातूर येथील श्री केशवराज विद्यालय, उच्च माध्यमिक शिक्षण राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे पार पडले.


 
Top