उस्मानाबाद (प्रतिनिधी) कोरोना विषाणू ची साखळी तोडण्यासाठी राज्यात लोक डाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे रेशन या लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदूळ हे अन्नधान्य रास्त भाव दुकान ना मार्फत वितरीत करण्यात येणार असून त्याचा लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

अन्नधान्याचे वाटप करून विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्षांक निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेच्या लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी मोफत अन्नधान्य (गहू व तांदूळ) वाटप करण्यात येणार आहे. जे लाभार्थी रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य खरेदी करण्यासाठी येतील. त्याला एप्रिल किंवा मे महिन्यापैकी ज्या लाभार्थ्यांनी एप्रिलसाठी त्या लाभार्थ्यास देय असलेले अन्नधान्य जर यापूर्वीचखरेदी केले असेल तर त्या लाभार्थ्यास या महिन्याचे देय असलेले अन्नधान्य अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति महिना प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थी रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य खरेदी करण्यासाठी येतील त्याला यापैकी ज्या लाभार्थ्यांनी एप्रिलसाठी त्या लाभार्थ्यास देय असलेले अन्नधान्य खरेदी केले नसेल तर त्या लाभार्थ्यास माहे एप्रिलसाठी असलेले अन्नधान्य अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेच्या लाभार्थ्यास प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. यासाठी या योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख उस्मानाबाद तालुका पुरवठा अधिकारी राजाराम केलूरकर यांनी केले आहे.

 
Top