उस्मानाबाद / प्रतिनिधी  - 

उस्मानाबाद शहरात इंदिरा नगर परिसरातील सांजा रोडवर दोन मित्रात दारुच्या नशेत वाद होऊन बरगाडीत चाकू खूपसून खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधीक माहीती अशी की उस्मानाबाद येथील विशाल राम बंडगर वय २० वर्षे याला बरगाडीत चाकू खूपससून प्रेम राजेंद्र आयवळे याने खून केला.दोघ मित्र होते दारुच्या नशेत दि.५/४/२०२१ रोजी इंदिरा नगर मध्ये सांजा रोडवर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाद घालत होते.त्याच दरम्यान हि घटना घडली आयवाळे याने बंडगर याच्या बरगाडात चाकू मारला त्यात रक्तश्राव जास्त झाल्यामुळे उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात प्रथमिक उपचार करुन प्रक्रती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.परंतू रक्तश्राव झाल्यामुळे बीपी लो होऊन दि.६/४/२०२१ रोजी पहाटे तीन वाजता मयत घोषीत करण्यात आले. याबाबत उस्मानाबाद शहर पोलीसांनी मयताचा मरणापूर्वी जबाब घेऊन शहर पोलीस  ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आसून आरोपीला उस्मानाबाद शहर पोलीसांनी अटक केली आहे. घटनेचा पूढिल तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर सुर्वे हे करत आहेत.

 
Top