तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील लातूर रस्त्यावर असणाऱ्या बायपास चौकात सातत्याने  अपघात घडत असल्याचा पार्श्वभूमीवर आराणाजगजितसिंहपाटील यांनी शनिवार दि.३ रोजी अपघात स्थळास भेट देवुन पाहणी केली.

 यावेळी  संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्याशी चर्चा करुन शुक्रवारी झालेल्या अपघाताची हायवे सुरक्षा समितीने पाहणी करुन अपघाताची जबाबदारी निश्चित करुन दोषीवर गुन्हे दाखल करावेत अशी सुचना देवुन या पुढे येथे अपघात घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची ताकद संबधितांना दिली.

शुक्रवार रोजी तीन वाहनांचा  झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते येथे सातत्याने अपघात होत असल्याचा पार्श्वभूमीवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी सकाळी अपघातस्थळी दाखल झाले व यावेळी हायवेचे पी.आय पाञे, तुळजापूरचे पी.आय मनोज राठोड व दिलीप बिडकाँनचे अधिकारी राऊत यांच्या समावेत चौकाची पाहणी करुन संबंधितांशी चर्चा केली. यावेळी अपघातातील जखमीचे नातेवाईक तसेच काक्रंबाचे सरपंच अनिल बंडगर आनंद कंदले उपस्थितीत होते.

अपघात घडू नये यासाठी तडवळा व सिंदफळ कडुन येणाऱ्या बायपास रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याचा सुचना केल्या तसेच भविष्यात या चौकात अपघात घडू नये यासाठी उड्डाण पुल किंवा एका बाजूला भुयार रस्ता करण्याबाबतीत चर्चा झाली .तसेच रमलर बसविण्याचा ही निर्णय झाल्याचे समजते. यावेळी बायपासची पाहणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी करुन कामाचा आढावा घेतला.

 काक्रंबा पुला संदर्भात सोमवारी बैठक!

काक्रंबा गावानजीक पुलाबाबतीत ग्रामस्थांचा अनेक तक्रारी असुन याची सविस्तर माहीती सरपंच अनिल बंडगर यांनी यावेळी सांगितले असता या पुला बाबतीत  सोमवारी संबंधित अधिकारी यांची बैठक  आयोजित करण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितली.

 
Top