कळंब/ प्रतिनिधी- 

येरमाळ्याकडुन भरघाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुकाचीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि.3 एप्रिल रोजी 11.30 च्या दरम्यान आंदोरा जवळ घडली आहे.

 पोलीस सुञाकडुन मिळालेल्या माहीती नुसार दुचाकीवरून कळंब येरमाळा रोडने जात असताना येरमाळ्याकडुन कळंब कडे येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच 14 एच.डी 0561 या चारचाकी कारने दुचाकीला धडक दिली.या घडकेत दुचाकीवरील जवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुधीर विश्वनाथ लोमटे वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला तर  त्यांची  पत्नी अनिता लोमटे वय 42 यांचा उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर  मृत्यू झाला आहे.अपघात एवढा भयानक होता की 200 फुट चारचाकी वाहनाने मयत दाम्पत्याला फरफडत नेले. ही चार चाकी गाडी महिला चालवत असल्याचे  माहीती तिथे हजर असणाऱ्या नी सांगितले.अपघाताची माहिती  मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. .शिक्षक सुधीर लोमटे व त्यांची पत्नी अनिता लोमटे यांच्या अपघाती निधनाने सर्वञ सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

  त्यांच्या वर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.व जवळा येथे अंत्यविधी करण्यात आला.

 
Top