उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी शाखा पाडोळी ( कारखाना)  येथे रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी च्या १८ व्या शाखेचा उद्घाटन समारंभ चेअरमन ॲड व्यंकटराव गुंड  यांच्या शुभहस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला.

 


यावेळी बँकेचे व्यवस्थापक श्री.खांडेकर यांनी प्रास्ताविक करून संस्थेची आजतागायत चाललेल्या कारभाराबद्दल माहिती करून दिली यानंतर चेअरमन यांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी रुपामाताचे व्हाईस चेअरमन सुधाकर बाबा पवार तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, पाडोळीचे उपसरपंच बाबुराव भाऊ पुजारी ,जेष्ठ नागरिक सुर्यकांत शिराळ गुरुजी, राजेंद्र शिराळ, सोसायटीचे माजी चेअरमन भरत दाजी गुंड, रूपामाताचे सरव्यवस्थापक सत्यनारायण बोधले ,मिलिंद खांडेकर, ॲड अजित गुंड, अभियंता संदीप गुंड, ॲड निवृत्ती कुदळे, गोपाल जंगाले,सुरक्षा अधिकारी लिंबराज मसे, शाखा व्यवस्थापक कास्ते साहेब ,सचिन गुंड, सतीश लांडगे, सोमेश्वर शिंदे, रामदास अप्पा गुंड, ग्रामपंचायत सदस्य सहदेव ढाकरे, हनुमंत चव्हाण, गुरलीगं दादा राऊत, ॲड शरद गुंड उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडला. 

 
Top