उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 जिल्ह्यात कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे जिल्हावासिय त्रस्त झाले असून या रुग्णांना ऑक्सिजनसह इतर सोयीसुविधे अभावी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर काही रुग्ण दगावले देखील आहेत. ही बाब ओळखून कर्तव्यदक्ष म्हणून राज्यभरात परिचित असलेले शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री, सतत व सदैव जनसेवेसाठी पुढाकार घेणारे जलक्रांतीचे प्रणेते आ. प्रा‌. तानाजीराव सावंत यांनी उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास तात्काळ ५ जम्बो ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून देत लोकसेवकाची जबाबदारी खऱ्या अर्थाने  निभावण्याचे काम केले आहे. त्यांच्या ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या योगदानामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.

आ. तानाजीराव सावंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची विचारपूस करीत अत्यावश्यक असलेले ५ जंबो ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर दि.२७ एप्रिल रोजी उपलब्ध करून देत ते तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी स्वतः  पुढाकार घेऊन व जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना सोबत घेऊन जोडणी करुन त्याचा उपयोग

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सुरु केला आहे. त्यामुळे रुग्णावर आलेले भयानक मोठे संकट निवारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.  जिल्हावासियांच्या मदतीसाठी आ. तानाजीराव सावंत हे सक्रिय झाले असून त्यांनी जिल्ह्याच्या विविध भागात दौरा करून आढावा बैठका घेत शासकीय यंत्रणेला सतर्क करीत अत्यावश्यक लागणाऱ्या सर्व मदतीसाठी मी कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना देखील संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आवश्यक ते बळ देण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वनिधीतून ५ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत.  सावंत यांचे हे काम अतिशय नियोजनबद्ध असून ते आपत्तीच्या काळात जिल्हावासियांच्या मदतीला धावून आले असल्यामुळे त्यांचे काम फार दिलासादायक ठरु लागले आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हा संघटक तथा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, नगरसेवक सुरज साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी.के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top