तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील हंगरगा नळ येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नागरिकांना लसीकरण देण्यास सुरुवात करण्यात आली.

राज्यात  ४५ वर्षा वरील सर्व नागरिकांना लसीकरण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात आता ग्रामीण भागातून नागरिकांतून लस साठी मागणी वाढली आहे . त्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात नागरिकांनी गर्दी केली आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लस तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केली आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समितीचे सदस्यपती तथा सरपंच अशोकराव पाटील यांनी हंगरगा नळ येथील उपकेंद्रास भेट दिली असता.या ठिकाणीं हंगरगा व्यतरिक्त बोरगाव,नंदगाव येथील नागरिकांनी गर्दी केली  होती.त्यामुळे या ग्रामीण भागात लस तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

यावेळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवशंकर वाघोले, सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले, संजय वाघोले, संतोष वाघोले, काटे गुरुजी, रमेश वाघोले, वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू सातपुते डॉ.बम्हा , आरोग्य सेविका जाधव ,ग्रामसेवक अनिल पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत स्वामी,  आशा कार्यकर्ती हिरा चव्हाण, अंगणवाडीत कर्मचारी जाधव उपस्थित होते.

 
Top