तेर / प्रतिनिधी-

कोऱोना रोग होऊ नये म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस  घेण्यासाठी नागरिक सरसावले आहेत.

 तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनंदा मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांना कोविड लस देण्यासाठी कर्मचारी परीश्रम घेत आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामीण रुग्णालयात कोरोना रोग होऊ नये म्हणून व शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी म्हणून तेर व परीसरातील नागरीक कोविड लस घेण्यासाठी सरसावले आहेत. 12 मार्च 2021 पासून 23 एप्रिल 2021 पर्यंत 1510 नागरिकांनी कोविडची लस घेतली असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक अमोल आग्रे यांनी दिली. कोविड लस घेण्यासाठी नागरीक सरसावलेले दिसून येत आहेत.

 
Top