कळंब / प्रतिनिधी- 

कळंब शहरात पाचशे दोनशे च्या बनावट नोटाचे रॅकेट चा पर्दाफाश करण्यात कळंब पोलीसांना यश आले आहे .याचे मुख्य कनेक्शन लातुर शहरात असुन लाखोंच्या बनावट नोटा चलनात आल्याने मोठी खळबळ माजली आहे.या बाबत कळंब पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

 कळंब शहरात ड्युप्लीकेट नोटांचे रॅकेट गेल्या अनेक दिवसापासुन चालु होते, पाचशे तसेच दोनशे रूपयांचे चलन बाजारात फीरू लागल्याने अनेकांना धक्का बसला व व्यापारी ग्राहक संशयाने एकमेकाकडे पाहु लागले परंतु एका व्यापाऱ्याने कळंब चे पोलीस निरिक्षक तानाजी दराडे यांना बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचे गेल्या चार पाच दिवसापुर्वीच सांगीतले होते.

पोलीसांनी सापळा रचुन शुक्रवारी मध्यरात्री पोलीस निरिक्षक तानाजी दराडे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी राऊत, हांगे एस एल, अमोल जाधव, कुवळेकर, रेखा काळे ,यांनी असरफअली तायरअली सय्यद (वय २५ बाबा नगर कळंब ) या आरोपीला पळुन जात असताना शहरात पकडले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० च्या 3 व 2००रुपयाच्या पाच ड्युप्लीकेट नोटा मिळाल्या आहेत. पोलीसांनी घराची झडती घेतली असता आणखी पाचशे व दोनशेच्या ड्युप्लीकेट नोटा पोलीसांना मिळाल्या असुन कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

 
Top