उस्मानाबाद  /  प्रतिनिधी 

निमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद शहरातील सुप्रसिद्ध डाँक्टर प्रदीप भानुदासराव कावरे वय ( ४७) यांचे कोरोनामुळे शनिवार दि.२४ एप्रील रोजी रात्री ११-०० वाजता उपचारा दरम्यान निधन झाले शहरातील काकडे प्लाँट , रामनगर ,  गालीबनगर , परिसरातील रुग्णांसाठी ते मोठे आधार होते .कोरोना संकटाच्या काळात ही त्यांची अविरत रुग्णसेवा सुरु होती जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात ही त्यांनी कोराना रुग्णांवर उपचार केले होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , एक मुलगा, एक मुलगी , बहीण  , भाऊ , असा परिवार आहे.


 
Top