उस्मानाबाद  /  प्रतिनिधी

आळणी येथे अँक्टिव रूग्ण संख्या 41 तर मृत्यूची संख्या 04 आहे हि वाढती संख्या पाहता माझे गाव माझी जबाबदारी ही मोहिम आळणी गावात सुरू केली.घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी,यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात.हि योजना प्रभावी पणे राबविण्यात यावी.यासाठी आज सी एच ओ डॉ ज्योती वडगावे,ए एन ,एम टेकाळे मँडम,आशावर्कर कालिंदा कदम,नंदा कदम,शोभा गायकवाड यांच्या कडुन आळणी गावातील आरोग्य विषय माहिती घेऊन उपयोजने संदर्भात आढावा घेतला.

यावेळी उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,सरपंच प्रमोद काका वीर,शिवसेना उप तालुकाप्रमुख धनंजय वीर,ग्रामसेवक सुजय मैंदाड,पोलीस पाटील प्रमोद माळी,ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड,सुनिल माळी,विजयकुमार नांदे,बालाजी तौर,राजाभाऊ नांदे यांची उपस्थिती होती.

 
Top