वाशी / प्रतिनिधी-

 माजी जलसंधारण मंत्री तथा भूम परंडा वाशी चे विकासरत्न आमदार मा.प्रा . तानाजीराव सावंत साहेब यांनी दि .२७ / ०४ / २०२१ रोजी मतदार संघातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय वाशी , भूम व उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे भेट देवून मतदार संघातील कोविड १ ९ प्रादुर्भावाचा आढावा घेवून अडचणी समजून घेतल्या होत्या.त्यावेळी ग्रामीण रुग्णालय वाशी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कपिलदेव सहदेव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय स्तरावर कोविड १ ९ च्या अनुषंगाने आवश्यक laboratory मशिन उपलब्ध करुन दिल्यास , कोविड १ ९ पॉझिटिव्ह रुग्णाला कराव्या लागणाऱ्या ( CBC , ESR , CRP , LDH , D Dimer , Sr.Feritin ) मोफत उपलब्ध झाल्यास प्रति रुग्ण किमान पाच हजार ची बचत प्रत्येक सर्वसामान्य रुग्णाची होणार आहे.व उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल प्राप्त होवून , कोविड रुग्णास योग्य तो उपचार देवून सदरील रुग्ण कोविड च्या तीव्र स्वरुपात जाण्यापासून थांबवता येतो .या संकल्पास आमदार साहेबांनी तात्काळ मान्यता देवून ५.२५ लक्ष रुपयाची लॅब मशिनरी ( cell counter , biochemistry analyser ) ग्रामीण रुग्णालय वाशी स्तरावर उपलब्ध करुन दिले.त्याचबरोबर कोविड १ ९ रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका , ग्रामीण रुग्णालयासाठी १० ऑक्सिजन concentrator व कोविड लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना उन्हापासून बचावासाठी मंडप तसेच बसण्यासाठी ५० खुर्ध्या स्वखर्चातून उपलब्ध करुन दिल्यात . वरिल सर्व बाबीचे आज दि .३० / ०४ / २०२१ रोजी मा.धनंजय सावंत उपाध्यक्ष जि.प. उस्मानाबाद मा.प्रशांत ( बाबा ) चेडे शिवसेना नेते, श्री.नागनाथ नाईकवाडी नगराध्यक्ष वाशी , माजी नगराध्यक्ष नितीन चेडे , श्री.उध्दव साळवी जि.प.सदस्य श्री.शिवहारी स्वामी , श्री.बाबा घोलप , श्री . सतिश शेरकर श्री विकास तळेकर डॉ.कपिलदेव पाटील , डॉ.महाविर कोटेचा , डॉ.विनोद पवार , डॉ . अमर तानवडे , डॉ.हिराळे , डॉ.सोनाली गाढवे , डॉ.संजीव गरड व सर्व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय वाशी येथे लोकार्पण करण्यात आले . 

यावेळी श्री.धनंजय सावंत साहेब यांनी मनोगनात सर्व शहरी व ग्रामीण आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्यात . तसेच श्री.प्रशांत ( बाबा ) चेडे यांनी मनोगनात सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कोविड १ ९ काळात समर्पितपणे काम करत असल्याबददल अभिनंदन केले व मनोधैर्य वाढविले . आणि डॉ.कपिलदेव पाटील यांनी मा.आमदार तानाजीराव सावंत साहेबांनी कोविड १ ९ च्या प्रादुर्भाव अनुषंगाने आपल्या मतदार संघातील ग्रा.रु.वाशी स्तरावर रुग्णाची निकड लक्षात घेवून स्वखर्चातून जी मशिनरी उपलब्ध करुन दिल्याने , ग्रा.रु.वाशी हे महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण.रु . असेल की जिथे कोविड रुग्णाचे कोविड प्रोफाईल चाचण्या मोफत होतील व आमदार साहेबांचा हा अभिनव उपक्रम नजिकच्या भविष्यात “ भूम परंडा वाशी पॅटर्न “ म्हणून महाराष्ट्रात नावारुपास येईल असा आशावाद व्यक्त करून आमदार महोदयांचे प्रातिनिधीक स्वरुपात आभार मानले .


 
Top