उस्मानाबाद / प्रतिनिधी-

“या भारतात बंधुभाव नित्य असु दे, दे वरची असा दे! हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसु दे, मतभेद नसु दे !!” असे विचार मांडणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

 यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून नृसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top