तुळजापूर  / प्रतिनिधी- 

तालुक्यातील आलियाबाद येथे आज दि.8 एप्रिल 2021 रोजी “जागतिक बंजारा दिना “ निमित्त ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

संपूर्ण जगातील बंजारा समाजातील थोर समाजसेवकानी ८ एप्रिल १९७० रोजी महाअधिवेशनाचे आयोजन करून जगातील बंजारा समाजाची  संस्कृती दिशा,व दशा सामाजिक प्रगती, राजकीय शैक्षणिक व आर्थिक स्थिती जाणून घेतली हाच तो दिवस ८ एप्रिल १९७०,”समाजाला प्रेरणा देणारा आहे म्हणून या दिवशी “जागतिक बंजारा दिन “ म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्त आलियाबाद येथे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व बंजारा कवी गणेश(महाराज )राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शिवाजी चव्हाण, प्रकाश राठोड, सुनील चव्हाण,शिवा चव्हाण, अभिजित चव्हाण, अभिषेक पवार,अजय चव्हाण, रावण राठोड, संदीप राठोड, राहुल चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top