भूम-परंडा-वाशी चे आमदार तानाजीराव सावंत हे आज दिनांक 27 एप्रिल रोजी वाशी तालुक्यातील कोरूना रुग्णाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते.यावेळी वाशी येथील कोरणा सेंटरला भेट देऊन उपस्थित कोरूना पेशंट यांना तेथे मिळणाऱ्या उपचाराची व तेथील भोजनाच्या व्यवस्थेची माहिती घेतली.तसेच रुग्णाची तपासणी कशा पद्धतीने केली जाते त्यांना कुठल्या प्रकारचे मेडिसन दिले जाते,त्यांचे केस पेपर कशा पद्धतीने तयार केले जातात. याबाबतही आमदार सावंत यांनी माहिती घेतली.यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कपिल पाटील यांनी कोरूना बाधित रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व न मिळणाऱ्या सुविधा याबाबत आमदार सावंत यांना माहिती दिली पाच लाख रुपये किमतीच्या सेल काऊंटर मशीन , ऍनालायझर मशीन व पॉईंट ऑफ केअर मशीन , यासंबधी खाजगी अथवा सरकारी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली . त्यामुळे रुग्णांच्या वेळेत तपासण्या होऊन उपचार करणे सोपे होईल , याकडे सावंत यांचे लक्ष वेधले . आदी तात्काळ लागणाऱ्या औषध गोळ्या व यंत्रसामुग्री आजच्या आज खरेदी करण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आल्या.याचा सर्व खर्च मी स्वतः भैरवनाथ शुगर वर्क्स च्या वतीने स्वतः करणार असल्याचची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालय वाशी येथे भेट देऊन आज पर्यंत झालेल्या लसीकरणाची व लसीकरण पद्धती ची माहिती घेतली.त्याचबरोबर वाशी तहसील मध्ये प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना महामारी मध्ये हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही अशा कडक् शब्दांमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.यावेळी वाशी चे गट विकास अधिकारी खिल्लारे यांना सूचना देऊन तालुक्यातील सर्व ग्रामसेवक कशा पद्धतीने काम करता त्याचा रोजचा रोज आढावा घेऊन माहिती पाठवण्याच्या सूचना दिल्या.त्याचबरोबर वाशी चे तहसीलदार यांना तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी कोरोना महामारी मध्ये कशा पद्धतीमध्ये काम करतात याबाबत व रोजच्या रोज आढावा देण्याचे सांगितले.याचबरोबर गोरगरीब जनतेला कोरोना महामारी मध्ये आलेला धान्याचा पुरवठा कसलाही काळाबाजार न होता सर्व जनतेला धान्य वाटप व्यवस्थित झाले पाहिजे अशा कडक् सूचना दिल्या.या बैठकीमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या ही भरपूर तक्रारी असल्यामुळे वीज वितरण कंपनी मधील दलाली कमी करा अशा तीव्र शब्दांमध्ये वाशी चे इंजिनीयर शेंद्रे यांना खडसावले. वाशी तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी वन वन फिरण्याची वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार सावंत यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषद कृषी सभापती दत्ता साळुंखे,गौतम लटके शिवसेना जिल्हाप्रमुख,प्रशांत चेडे,माजी नगराध्यक्ष नागनाथ नायकवडी,तालुकाप्रमुख ॲड सत्यवान गपाट,उपतालुकाप्रमुख विकास तळेकर,बाळासाहेब मांगले,जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे,ग्रामीण रुग्णालय वाशीचे वैद्यकीय अधीक्षक कपिल पाटील,वाशी चे तहसीलदार नरसिंग जाधव,गट विकास अधिकारी खिल्लारे,पोलीस निरीक्षक काशीद,तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शेंद्रे,आदी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.