उस्मानाबाद (प्रतिनिधी) – तुळजापूर – औसा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघाता संबंधी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जनरल मॅनेजर (तांत्रिक) तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नांदेड, तहसीलदार तुळजापूर, प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार व महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष साइट वर भेटी देऊन चर्चा केली.

या महामार्गावर रिंग रोड येथील जंक्शन वर अपघाताच्या घटना वाढत आहेत. गतिरोधक नसणे, दिशा दर्शक व सूचना फलक यांचा अभाव, अपूर्ण कामे, वळण रस्त्यावरील तंत्री चुका यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकत्याच दिनांक 2 एप्रिल रोजी झालेल्या अपघातामध्ये एकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिनांक 3 एप्रिल रोजी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन महामार्ग पोलिस व अधिकार्‍यां सोबत चर्चा केली होती, तसेच प्रकल्प संचालकांना आज बैठक आयोजित करण्या बाबत सूचित केले होते. या अनुषंगाने आज अपघात स्थळा सह काक्रंबा, नळदुर्ग रस्ता, सिंदफळ जंक्शन, रिंग रोड वरील इतर अपूर्ण कामे या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह जाऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या.

तुळजापूर औसा महामार्गावरील रिंग रोड जंक्शन च्या ठिकाणी होत असलेली अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करून तात्काळ मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी गतिरोधक बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आलेल आहेत. बायपास वरील अपूर्ण व रखडलेली कामे दोन-तीन दिवसात सुरु करण्यासह काक्रंबा गावातील पुलाचे काम देखील लवकरात लवकर सुरू करण्याचे सूचित केले आहे. रिंग रोड वरून नळदुर्ग रस्त्याला जाण्यासाठी अथवा येण्यासाठी सोय करण्यात आलेली नव्हती. मूळ प्रकल्प अहवालामध्ये याचा समावेश करण्यात आलेला न्हवता. याबाबत यापूर्वी डेलेल्या सूचनाच्या अनुषंगाने या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सिंदफळ येथील जंक्शन च्या ठिकाणी तर अनेक तांत्रिक चुका असून त्या लवकरात लवकर दुरुस्त करून जंक्शन सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

 
Top